भारतीय रेल्वेत लोको पायलटच्या 11127 जागांसाठी मेगा भरती सुरु; १०वी पास उमेदवारांना संधी! । Railway Loco Pilot Recruitment 2026

RRB ALP भरती 2026 – 11,127 असिस्टंट लोको पायलट पदांसाठी मोठी भरती

भारतीय रेल्वे विभागामार्फत असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilot) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण 11,127 रिक्त जागा उपलब्ध आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया 15 मे 2026 पासून सुरू होणार असून 14 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ⏳

रेल्वे विभागात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात ही भरती होणार असून उमेदवारांना चांगली सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन वेळेत अर्ज करावा. 🚆


भरतीची संक्षिप्त माहिती

  • पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट
  • पदसंख्या – 11,127 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण (अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी)
  • वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू तारीख – 15 मे 2026
  • अर्जाची शेवटची तारीख – 14 जून 2026
  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
  • वेतनश्रेणी – ₹19,900/- प्रतिमहिना

अर्ज कसा करावा?

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक आहे.
  • दिलेल्या लिंकवरूनच अर्ज सादर करावा.
  • शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करावा.

महत्वाच्या लिंक


सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. ही माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांनाही अर्ज करण्यास सांगा. 📢

Leave a Comment